प्रदीप पवार यांनी केले आयोजन
भोसरी : येथील कृपासाई फाऊंडेशन यांच्यावतीने परिसरातील सर्वात उल्लेखनीय असा रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला. कृपासाई फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रदिप पवार यांच्या अध्यक्षतेखाली रामनवमी शोभा यात्रा काढण्यात आली होती. कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील, विविध धर्माचे नागरिक उपस्थित होते. या शोभायात्रेमध्ये जवळपास 5000 ते 6000 रामभक्तांनी भाग घेतला होता. ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक पार पडली. यावेळी कार्यक्रमाला उपस्थिती भोसरीचे आमदार महेश लांडगे, माजी आमदार विलास लांडे, गटनेते एकनाथ पवार, युवा नेते आनंद लोणकर, जालिंदर बापू शिंदे यावेळी नगरसेवक सागर गवळी, वसंत बोराटे, निलेश बारणे, अभिषेक बारणे, रवी लांडगे, राजेंद्र लांडगे, नगरसेविका प्रियंका बारसे, भिमा फुगे, सोनाली गव्हाणे, नम्रता लोंढे, युवा नेते योगेश लांडगे, योगेश लोंडे, सर्व तालिम मंडळे आणि युवा कार्यकर्ते यांनी आवर्जून उपस्थिती लावली. कृपासाई फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रदिप भाऊ पवार यांनी रामनवमीचा कार्यक्रम उत्साहात व शांततेत पार पाडल्यामुळे कार्यकर्त्यांचे जाहीर आभार मानले.
कृपासाई फाऊंडेशनच्यावतीने नेहमी सामाजिक उपक्रम राबविले जातात. गेल्या तीन वर्षांपासून फाऊंडेशनच्यावतीने कृष्ठरोग्यांसाठी मदत, पांजर पोळ, गो शाळेला चार्याची मदत, माणुसकीची भिंत उपक्रम, भोसरी एमआयडीसीमध्ये अदिवासी मुलांचे वसतीगृहामध्ये अन्नदान असे उपक्रम राबविले जात आहेत.