कृषकांना दर्जेदार औजारांचा पुरवठा करावा : ना. रावल

0

धुळे। शेतकर्‍यांना पारंपरिक अवजारे यांचा पुरवठा न करता अत्याधुनिक यंत्रसामुग्रीचा पुरवठा करावा. शेतकर्‍यांनीही नवीन तंत्रज्ञानाचा अंगिकार करीत उत्पादनात वाढ करावी, असे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी केले आहे.

शिंदखेडा पंचायत समिती आवारात आदिवासी क्षेत्राबाहेरील लाभार्थ्यांना पाईप, डिझेल इंजिन, नांगर, पंप यासह ताडपत्री व शेती उपयोगी अवजारांचे वाटपमंत्री रावल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी शिंदखेडा पंचायत समिती सभापती सुनंदा गिरासे, जिल्हा परिषद सदस्य कामराज निकम, पंचायत समिती सदस्य दरबारसिंग गिरासे, जी. डी. देवरे, कृषी अधिकारी डॉ. तिवारी, वाय. पी. गिरासे उपस्थित होते.