दिल्ली । जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचा (जेएनयू) विद्यार्थी असलेल्या रोहित वेमुलाच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण झालेले असतानाच, होळीच्या दिवशी संध्याकाळी जेएनयूच्या आणखी एका दलित विद्यार्थ्याने आत्महत्या करत जीवन संपवल्याचे उघड झाले. तामिळनाडूतील सेलम जिल्ह्यात राहणार्या मुथुकृष्णनन जीवानदंम (रजनी कृष) याचा मृतदेह सोमवारी एका मित्राच्या घरी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला. 25 वर्षीय मुथुकृष्णन जेएनयूमध्ये एम.फीलचे शिक्षण घेत होता. विद्यापीठात समानतेची वागणूक मिळत नसल्याचा आरोप मुथुकृष्णने जुलै 2016 मध्ये त्याच्या अखेरच्या फेसबुक पोस्टमध्ये केला आहे.
सोमवारी मित्राच्या खोलीत जाऊन मुथुकृष्णनने गळफास घेतला त्यात त्याचा मृत्यू झाला. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मुथुकृष्णनने तणावामुळे आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. दरम्यान, डाव्या आणि पुरोगामी विचारांच्या संघटनांनी आणखी एका रोहितचा प्रशासनाने बळी घेतल्याचा आरोप केला आहे. मुथुकृष्णनन सोमवारी मित्राकडे जेवायला गेला होता. मित्राच्याच खोलीत तो झोपायला गेला. त्याने खोलीत स्वतःला बंद करून घेतले आणि गळफास घेऊन आत्महत्या केली. मुथुुकृष्णननच्या मित्राने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. दरवाज्याला असलेल्या एका फटीमधून मुथुकृष्णनने पंख्याला गळफास लावून घेतल्याचे दिसल्यावर मित्रांनी पोलिसांना पाचारण केले.
मुथुुकृष्णनने जुलै महिन्यात फेसबूकवर शेवटची पोस्ट लिहिली होती. त्यात त्याने म्हटले आहे. की, जर समानता नसेल तर काहीच नाही. एम.फील आणि पीएचडी प्रवेशासाठी कोणतीही समानता दिसत नाही. तोंडी परिक्षेमध्येही बरोबरी नाही, फक्त समानतेचा दिखावा केला जातो. प्रशासकीय भवनात विद्यार्थ्यांना निदर्शने करू दिली जात नाही. विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची बरोबरी नाही.विद्यापीठातील विद्यार्थी मुतुकृष्णननच्या आत्महत्येमुळे शोकमग्न आहेत. हैद्राबाद विद्यापीठाचे माजी विद्यार्थी विन्सेट बेनी यांनी फेसबुकवर लिहिले की, अत्यंत हृदयद्रावक घटना आहे. देव त्याच्या आत्म्याला शांती देओ. मला नाही माहीत तू हे पाऊल का उचलले. तू अनेक अडचणींचा सामना करून शिक्षण घेतले होते. मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती.