कृषिग्राहकांच्या वीज वेळापत्रकात बदल

0

मुंबई । वीज निर्मिती केंद्रांना कोळशाच्या उपलब्धतेत व पुरवठयामध्ये अडचणी येत असल्यामूळे राज्यात तात्पूरते भारनियमन करण्यात येत आहे. त्यामुळे विजेची उपलब्धता व मागणी यांचे नियोजन करण्यासाठी कृषिग्राहकांच्या वीज उपलब्धतेच्या वेळापत्रकात तात्पुरता बदल करण्यात आला आहे.

राज्यात कृषिपंपासाठी ज्या ठिकाणी स्वतंत्र वाहिन्या उभारल्या आहेत व ज्या ठिकाणी सिंगल फेजिंग योजना आहे अशा वाहिन्यांवर सद्यपरिस्थितीत दिवसा 8 तास व रात्री 8 तास अशा दोन टप्प्यांमध्ये चक्राकार पध्दतीने रात्री 10 वाजल्यापासून ते सायंकाळी 7 वाजेपर्यन्त अखंडित वीजपुवठा करण्यात येत आहे. विजेच्या उपलब्धतेत सुधारणा होताच कृषिपंपांना दिवसा 8 तास व रात्री 10 तास वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येईल. विजेची उपलब्धता वाढविण्यासाठी महावितरण प्रयत्न करीत आहे. लघु निविदेद्वारे बाजारातून वीज खरेदी करण्यात येत आहे. याशिवाय पॉवर एक्सचेंजमधूनही वीज खरेदीसाठीचे प्रयत्न सुरु आहेत.