कृषिचे पुरस्कार दरवर्षी एकाच दिवशी द्यावे!

0

मुंबई:– राज्यातील शेतकऱ्यांनी देशाच्या कृषी विकासात मोठ्या प्रमाणात हातभार लावला आहे. बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी केलेल्या अभिनव प्रयोगांमुळे महाराष्ट्रातील शेती क्षेत्रात आमुलाग्र बदल दिसून येत आहे. मात्र शेतकऱ्यांना प्रेरणा देण्यासाठी देण्यात येणारे कृषी पुरस्कार दरवर्षी नियमितपणे एकाच दिवशी घेतले जावेत अशा सूचना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी राज्य सरकारला केल्या आहेत. कृषी पुरस्कार वितरण सोहळ्याला झालेल्या विलंबावरून सरकारवर टीकेची झोड उठली असताना राज्यपालांनीही ताशेरे ओढले.

मुख्यमंत्र्यांचे केले कौतुक
यावेळी राज्यपालांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मात्र कौतुक केले. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा जो निर्णय घेतला आहे त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो, असे ते म्हणाले. या निर्णयामुळे 89 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार असून 40 लाख शेतकरी कर्जमुक्त होणार आहे. शाश्वत शेती, सेंद्रीय शेती, फलोत्पादन, फूल शेती आणि कृषी प्रक्रिया उद्योगामध्ये महाराष्ट्राला आदर्श राज्य बनवुया, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.