बारामती । बारामती शहरात डेंगूची लागण पसरत असतानाच शहरातील मध्यवर्ती भागात व्यापारी वसाहतीमधून तळघरात साठलेले पाणी हा विषय ऐरणीवर आला आहे. त्यातच कृषिराज लॉजच्या तळघरातील प्लॅस्टिकचा कचरा वाहून नेणारा एक ट्रॅक्टर नुकताच आढळून आला.अनेक व्यापारी इमारतींच्या तळघरात पाणी साठलेले आहे. तसेच तळघरातून प्लॅस्टिकचा कचरा साठलेला आहे. यामुळे डासांच्या आळ्यांची पैदास मोठ्या प्रमाणावर होत आहे. नगरपालिकेच्या आरोग्यविभागास याबाबत तक्रार केल्यानंतर आरोग्यविभागाने प्रत्यक्ष पाहणी करून संबंधितांना नोटिसा पाठविल्यानंतर व्यापार्यांनी पाणी व कचरा काढण्यास सुरुवात केली आहे.