तर्हाडी । महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालय, शहादा येथील कृषीदुतांचे तर्हाडी या गावात आगमन झाले आहे. ते पंधरा आठवडे या गावात निवास करणार आहेत.
या कालावधीमध्ये शेतकर्यांना फायदेशीर ठरणार आहे. विविध प्रकारचे प्रात्यक्षिक होणार आहेत व शेतकर्यांना नवीन तंत्रज्ञानाविषयी माहिती सांगणे, गावांमध्ये विविध सामाजिक कार्यक्रम राबवणे हे त्यांचे मुख्य ध्येय आहे. या पथकात भरत महाजन, अरविंद बिरारे, इसरवाडे राहुल, योगेश्वर कदम, नितेश गावित, वैभव कापडणीस यांचा समावेश आहे. पथकाचे सरपंच कैलदास भामरे, उपसरपंच व सर्व गावकर्यांनी स्वागत करून त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.