धुळे । शहरासह जिल्ह्यात अनेक भामटे दिवसाढवळ्या वीज चोरी करतात. याकडे दुर्लक्ष करून शेतकर्यांचे कृषी पंपाचे वीज कनेक्शन मात्र वीजबिल थकल्यामुळे तोडले जाते. याचा अर्थ चोर सोडून संन्याशाला फाशी, असा अजब प्रकार वीजवितरण कंपनी अवलंबत आहे. याची दखल घेत वीज वितरण कंपनीने शेतकर्यांचे कृषीपंपाचे तोडलेले वीज कनेक्शन ताबडतोब जोडावे, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे. प्रभारी जिल्हाधिकारी गंगाथरण देवराजन यांना निवेदन देण्यात आले आहे.
आंदोलनाचा इशारा
वीजवितरण कंपनीच्या मनमानी कारभाराची दखल घेवून शेतकर्यांची कृषीपंपाची वीजजोडणी ताबडतोब जोडावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे. वीजचोरांकडे कानाडोळा केला जात असल्याने सेनतर्फे नाराजी व्यक्त करण्यात आली. वीजबिल थकबाकीदार शेतकर्यांवर वीज कनेक्शन तोडण्यात आले असून त्यांचे वीज कनेक्शन ताबडतोब जोडण्याची मागणी केली. शिवसेना जिल्हाध्यक्ष हिलाल माळी, संजय गुजराथी, अतुल सोनवणे, महेश मिस्तरी, भुपेंद्र लहामगे, सुनिल बैसाणे, नरेंद्र अहिरे, कैलास पाटील, गोकुळ देवरे, महेश माळी, जितेंद्र सुर्यवंशी,राजेंद्र माळी, केशव माळी यांच्यासह चंद्रकांत पाटील,दत्तु पाटील, रामचंद्र पाटील, ओंकार पाटील, भिवसन मराठे, राजेंद्र माळी, उदयसिंग राजपुत,बापू राजपुत, नानाजी पाटील, प्रकाश माळी, शिवाजी पाटील, विजय पाटील आदींनी दिला आहे.
बोंडआळींमुळे शेतकरी खचला
शहरासह जिल्ह्यात वीजचोरीसंदर्भात भामट्यांना घाबरून अथवा अर्थपुर्ण व्यवहार करून या वीजचोरीकडे कानाडोळा केला जात आहे. अनेक वर्षांपासून जिल्ह्यात दुष्काळाचे सावट आहे. थोड्याफार प्रमाणात कपाशीचे पीक शेतकर्यांच्या हातात येणार होते. त्यातही बोंडअळीने कहर केल्याने शेतकरी खचला आहे. कृषीपंपाचे कनेक्शन तोडतांना किमान 15 दिवसांची नोटीस देवून ग्राहकाला न कळविता, वीजवितरण कंपनी मनमानी कारभार चालवत असल्याचा आरोप होतो.