कृषीप्रधान अर्थव्यवस्था मजबूत करण्याची गरज

0

फैजपूर । शहरातील धनाजी नाना महाविद्यालयात मराठी अर्थशास्त्र परिषदेचे 41 वे राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन झाले. लोकसेवक मधुकरराव चौधरी यांच्या प्रतिमेस माजी कुलगुरू डॉ. आर.एस. माळी यांच्याहस्ते माल्यार्पण करण्यात आले. उच्च शिक्षण सहसंचालक प्रा.डॉ. केशव तुपे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. यात अर्थतज्ञांनी कृषीप्रधान अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर मार्गदर्शन केले.

नोटबंदी, जीएसटीवर झाली चर्चा
व्यासपीठावर वेलफेअरचे डॉ. सदानंद पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, महाविद्यालयाचे प्राचार्य पी. आर. चौधरी, मसाका चेअरमन शरद महाजन, माजी आमदार रमेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नोटबंदी, जीएसटी, शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य लोकांवर चांगले का वाईट परिणाम झाले यावर मान्यवरांनी थोडक्यात माहिती दिली.