अमळनेर । अमळनेर तालुका नेहमी विविध राजकीय चर्चेत असतो त्याच प्रमाणे आज कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या कार्यक्रमा प्रसंगी परीवर्तनाची लाट घेऊन अमळनेर तालुक्याचे अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेले तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सहयोगी सद्स्य माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी आज महसूल तथा जिल्ह्याचे पालक मंत्री ना.चंद्रकात पाटील, जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन व सहकार पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश घेतला. त्यांच्या सोबत दलित नेते रामभाऊ संदानशिव, अनिल अंबर पाटील, नगरसेवक राजेश पाटील, निशांत अग्रवाल यांनी आज भाजपात प्रवेश घेतला.