शहादा। शहादा तालुका पंचायत समितीच्या अंतर्गत शेती उपयोगी साहित्य लाभार्थ्यांना वाटपासाठी येवून पडले आहे.माञ जिल्हा परिषद व तालुका प.स.च्या लोकप्रतिनीधी यांच्यातील समन्वयाअभावी लाभार्थीना योजनेचा फायदा होत नाही.आता खरीप हंगाम सुरू होऊन बरेच दिवस झालेत.अद्याप साहित्य वाटप झाले नाही.म्हणून वेळेवर साहित्य मिळाले तर शासनाच्या योजनेचा उपयोग असा सुर लाभार्थ्याचा निघत आहे.शहादा पंचायत समिती अंतर्गत ग्रामीण भागातील शेतकरी- शेतमजुर तसेच इतर व्यवसायिकांना समाज कल्याण विभाग व इतर योजनेतून लाथार्थ्यांसाठी साहित्य देण्यात
येते.
व्यावसायिकांसाठी आर्थीक सहकार्य
शेतीसाठी नांगर, वखर, टँक्टर-ट्रॉली हातपंप, पाईप, सौर उर्जा वरील कंदिल, विळा-खरपणी हतोडा, लहाण टँक्टर यासह व्यावसायिकांसाठी आर्थीक सहकार्य करून व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहीत करीत असतात. गेल्या दोन महिन्यापासुन पंचायत समिती आवारात शेती उपयोगी पाईप येउन पडले आहेत .नागरटी, वखरटी,सौर उर्जावरील लँम्प व इतर साहित्य गोदामात पडला आहेत.गेल्या पंधरा दिवसापुर्वी स्थानिक लोकप्रतिनीधी साहित्य वाटप करण्याचा घाडा घातला होता.लाभार्थ्यांना शेती उपयोगी साहित्य त्वरीत दिले जावे म्हणून सत्ताधारी गटाने साहित्य वाटपाचा निर्णय घेऊन दिवस ठरविला होता.
सभापतींना डावलून कार्यक्रम
मात्र याची कुरबुर जिल्हा परीषदेतील सत्ताधारी गटाला लागली.जिल्हा परिषद समाजकल्याण सभापतींना डावलून कार्यक्रम होत असल्याने चर्चेला उधाण सुरू झाले.लोकप्रतीनीधी- प्रशासन यांच्यात ताणतणाव वाढला. साहित्य वाटप दिवस रद्द झाला. ठरलेल्या दिवसी कार्यालय आवारात आलेल्या काही लाभार्थींना साहीत्य न मिळाल्याने रिकाम्या हाती परतावे लागले.पंचायतसमितीने लाभार्थ्यांची यादी निश्चित केली आहे.त्या प्रमाणात साहित्य उपलब्ध झालेली आहेत.मग त्या साहित्य वाटपास दिरंगाई कोणाकडून होत आहे.
उपयोग काय? असा सूर लाभार्थींमध्ये
जिल्हा परीषद व तालुका पंचायत समिती सत्ताधारी गटाने समन्वय साधुन लाभार्थ्यांना योजनांचा पुरेपुर उपयोग वेळेवर होण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे.साप निघून गेल्यानंतर काठी मारून उपयोग काय ? त्याचप्रमाणे शेती उपयोगी साहित्य गोदामात पडली आहेत. शेतकर्यांना वेळेवर ते साहित्य मिळाले नाही. तर त्याचा उपयोग काय असा सूर लाभार्थींमध्ये सुरू आहे. लोकप्रतिनीधींनी मानापमान विचार न करता समन्वय साधुन लाभार्थी साहित्य वाटप करावे अशा प्रतिक्रीया लाभार्थीकडून जोर धरत आहेत.