शहादा । येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंधरा जागांसाठी निवडणूक होणार आहे. पाच जागा राखीव तर उर्वरित दहा जागा सर्व साधारण खुला प्रवर्गासाठी राखीव आहेत गतवेळीस पंधरा जागेसाठी 11 जागा सोसायटी तर 4 चार जागा ग्रामपंचायत राखीब होत्या. यावेळीस प्रथमच मोठ्याप्रमाणात निवडणूक होत असून त्यासाठी 49 हजार 255 मतदार आहेत. एकूणच ही मिनि विधानसभा निवडणूक होणार अशी चिन्हे निर्माण झाली आहे.
भाजपकडे लक्ष
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत शेतकरी मतदार राजा सोबत उमेदवारी देखील करु शकतो त्यामुळे शेतकर्यांना येणार्या अडचणी भविष्यात सोडविल्या जावू शकतात. या निवडणुकीत कोणते राजकीय पक्ष सहभाग नोंदवितात हा येणारा काळ ठरविणार आहे. शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीवर आज पर्यंत स्व. पी के अण्णा पाटील यांच्या एक छत्री अम्मल राहिला आहे . व आज ही त्यांची परंपरा त्यांचे सुपुत्र व साखरकारखाना चेअरमन दिपक पाटील चालवत आहेत. त्यांचा जनसंपर्क व असलेला प्रभाव मोठा आहे. केंद्रात व महाराष्ट्रात भाजपा चे सरकार आहे. त्यामुळे निवडणुकीत भाजपा देखील मोठी टक्कर निर्माण करु शकते हे नाकारुन चालणार नाही
अशी आहे स्थिती : मोहिदा त. श. गण ( जनरल ) यात सात गावांचा समावेश असून तीन हजार 200 मतदार आहेत, कोंढावळ(जनरल) यास अकरा गावे असून मतदार तीन हजार 345 मतदार, कहाटुळ (ओबीसी) दहा गावे, तीन हजार 370 मतदार आहेत, वडाळी (जनरल) यात आठ आठ गावे असुन तीन हजार 252 मतदार आहेत. कळंबु (जनरल) यात पाच गावे असुन 3 हजार 324 मतदार आहेत. शिरुड दिगर (एस सी, एस. टी) गावास चौदा खेडी आहेत मतदार संख्या 3 हजार 357 मतदार आहेत . प्रकाशा (विमुक्त भटक्या जाती) यात पाच खेडी असुन मतदार संख्या तीन हजार 351 तर वैजाली (जनरल) गावास 14 खेडी जोडली असुन तीन हजार 271 मतदार आहेत. पाडळदा बु ( जनरल ) गावास 16 खेडी जोडली आहे मतदार संख्या 3 हजार 287 आहे. धुरखेडा ( महिला ) गावास सोळा खेडी जोडली आहे तीन हजार 245 मतदार आहेत . म्हसावद ( महिला ) गावास 17 खेडी असुन मतदार संख्या तीन हजार 169 आहेत . सुलवाडे (जनरल ) गावास 17 खेडी जोडली आहेत. मतदार संख्या तीन हजार 156 आहे सावखेडा ( जनरल ) गावासाठी बारा खे डी असुन मतदार संख्या तीन हजार 388 एवढी आहे . मंदाणे ( जनरल ) गावास तेरा खेडी जोडलेली असुन तीन हजार 164 मतदार आहेत. कृषीउत्पन्न बाजार समितीसाठी होवु घातलेली ही निवडणूक म्हणजे मिनी विधानसभा होय . एकुण पंधरा गण आहेत 180 गावांचा समावेश असुन सुमारे 49 हजार 255 मतदार संख्या आहे.
निवडणुकांची रणधुमाळी
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तळोदा अक्राणी व अक्कलकुवा या चार कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूका शासनाचा नवीन नियमानुसार होणार आहेत. शहादा बाजार समितीचा पंधरा जागेसाठी गत वेळीस निवडणूक झाली होती. त्यावेळी अकरा जागा या विविध कार्यकारी सहकारी सोसायटी व चार जागा या पंचायत समिती अंतर्गत होते. पंधरा उमेदवार निवडण्यासाठी एकुण बावीसशे ते चोवीसशे मतदार होते. त्यावेळी ज्यांचा हाती विविध कार्यकारी सोसायटी व पंचायत समितीवर सत्ता असे त्यांचेच वर्चस्व बाजार समितीवर असे. राज्यातील युती शासनाने यावेळी होणार्या बाजार समितीचा निवडणूकी करिता नवीन निकष लावले. त्यात प्रथमच शेतकरी सभासद ग्राह्य धरुन त्यास मतदानाचा हक्क मिळणार आहे.