मुंबई | कृषी उत्पन्नात दुपटीने वाढ करण्याच्या अनुषंगाने प्रकल्प आढावा बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानभवन येथे झाली. याप्रसंगी कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, कृषी विभागाचे प्रधान सचिव बिजयकुमार, कृषी आयुक्त सुनील केंद्रेकर, नानाजी देशमुख कृषी संजीवनीचे प्रकल्प संचालक विकास रस्तोगी, इक्रीसॅट संस्थेचे क्षेत्रीय संचालक डॉ. सुहास वाणी, जागतिक बँकेचे रंजन रॉय आदी उपस्थित होते.
गावांचा क्लस्टर पध्दतीने विकास करणे, कृषी उत्पन्नात दुपटीने वाढ करणे याबाबतचे सादरीकरण डॉ. सुहास वाणी यांनी केले. कृषी उत्पन्न वाढविण्यासाठी पाण्याचे योग्य नियोजन करणे, हवामानानुसार पिकाची निवड करणे याबाबतचेही त्यांनी सविस्तर सादरीकरण केले. महाराष्ट्र राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये व उत्तरप्रदेश राज्यातील सात जिल्ह्यांत हा प्रकल्प राबविण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.