कृषी कर्जमाफीच्या अर्जासाठी शेतकर्‍यांना 1 मेपर्यंत मुदतवाढ

0

मुंबई । यछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेस पात्र असेलेल्या शेतकर्‍यांना अर्ज भरण्याच्या मुदतीमध्ये 1 मे 2018 पर्यंत आणखी मुदत वाढ करण्यात आली आहे. काही कारणास्तव ज्या शेतकर्‍यांना अर्ज करता आले नाही, त्यांच्यासाठी कर्जमाफीच्या योजनेसाठी अर्ज करण्याची 14 एप्रिल ही अंतिम तारीख होती. मात्र, पात्र शेतकरी कर्जमाफी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, याकरिता मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा कर्जमाफीचा अर्ज करण्याची मुदत वाढवली आहे. वन टाइम सेटेलमेन्ट योजनेसाठी यापूर्वीच दिनांक 30 जून 2018 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

राज्यशासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीस पात्र शेतकर्‍यांना काही तांत्रिक कारणास्तव, अथवा कागदपत्रांच्या त्रुटीमुळे कर्जमाफीसाठी दिलेल्या मुदतीत अर्ज करता आले नव्हते. मात्र, पात्र असूनही कोणताही शेतकरी या योजनापासून वंचित राहू नये म्हणून दिनांक 1 मे 2018 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे जाहीर केला. या निर्णयामुळे वंचित राहिलेले पात्र शेतकरी अर्ज करू शकणार आहेत.