कृषी कायदा: भाजप सरकारमधील उपमुख्यमंत्र्यांकडून राजीनाम्याचा इशारा

0

नवी दिल्ली: मागील दोन आठवड्यापासून देशातील शेतकरी केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहे. १३ दिवसांपासून शेतकरी कडाक्याच्या थंडीतही दिल्ली सीमेवर ठाण मांडून बसलेले आहेत. विरोधकांनीही शेतकरी आंदोलनाला पाठींबा देत समर्थन दिले आहे. दुसरीकडे भाजपने कायद्याच्या समर्थनार्थ मैदानात उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे. आज शुक्रवारी देशभरात भाजप कृषी कायद्याच्या समर्थनार्थ बैठका, पत्रकार परिषदा घेत आहे. त्यातच हरियाणा सरकारमधील उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी शेतकऱ्यांना एमएसपी न दिल्यास उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे, त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. हरियाणात भाजपला जननायक जनता पक्षाने समर्थन दिले आहे. जेजेपीच्या समर्थावर सरकार स्थिर आहे. त्यातच चौटाला यांनी एमएसपीवरून भाजपला इशारा दिला आहे.