शेतकऱ्यांचा केंद्र सरकारला इशारा
नवी दिल्ली: केंद्र सरकारने संमत केलेल्या कृषी विधेयकाला देशभरातील शेतकरी विरोध करत आहे. हे कायदे शेतकरी विरोधी असून तत्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी देशभरातील विशेषत: पंजाब, हरियाणा राज्यातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसले आहे. केंद्र सरकारने चर्चेसाठी शेतकऱ्यांना बोलविले आहे, मात्र शेतकऱ्यांचा चर्चेसाठी जाण्यास नकार आहे. कृषी कायदे रद्द होत नाही तोपर्यंत शेतकरी आंदोलनावर ठाम आहे. दरम्यान आता कृषी कायदे रद्द न झाल्यास देशभरातील रेल्वे बंद करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांनी रस्ता अडविला आहे. आता रेल्वे मार्गही अडविण्याचा इशारा देण्यात आला आहे. विरोधी पक्षांनी देखील हे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रपतींची भेट घेतली आहे.