कृषी दिनानिमित्त यशवंत विद्यालयात वृक्षारोपण

0

नंदुरबार । नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात कृषी दिनानिमित्त वृक्षदिंडी काढून वृक्षारोपण करण्यात आले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडीत उत्साहाने भाग घेतला. तसेच त्यांच्या घोषणांमधून नवोदित विद्यार्थ्यांना हरितक्रांतीचा संदेश दिला जात होता. या वृक्षदिंडीची सुरुवात नंदुरबार तालुका विधायक समितीचे उपाध्यक्ष मनोजभैय्या रघुवंशी व सचिव यशवंत पाटील यांचे हस्ते वृक्षदिंडीची सुरुवात करण्यात आली. यावेळी वृक्षदिंडी संपल्यानंतर यशवंत विद्यालयाच्या क्रीडांगणावर कडूलिंब, बकाम, गुलमोहर आदी वृक्षांचे मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

वृक्षारोपण शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते
या कार्यक्रमाला नगरसेवक बी.ए.पाटील, नगरसेवक दीपक दिघे, माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे, सामाजिक कार्यकर्ते कैलास पाटील, प्राचार्य शिवाजी पाटील, पर्यवेक्षक अरुण हजारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. पाहुण्यांचा हस्ते वृक्ष लागवडीनंतर काही वृक्षारोपण शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले. वृक्ष लागवडी जशी केली, तसेच वृक्ष मोठी होईपर्यंत त्यांची काळजी घ्यावी, असे शालेय विद्यार्थ्यांना मनोज रघुवंशी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी वृक्ष लागवडीचे महत्त्व संस्थेचे सचिव यशवंत पाटील यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.