रावेर अॅग्रो असोसिएशन व कृषी विभागाने वाहिली पांडुरंग फुंडकर यांना आदरांजली
रावेर- कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांचे गुरुवारी पहाटे हृदयविकाराने निधन झाल्यानंतर कृषी क्षेत्रावर शोककळा पसरली. रावेर येथील कृषी विभागाच्या कार्यालयात कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांना रावेर तालुका अॅग्रो डीलर्स असोसिएशन व कृषी विभागातर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार, पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी एस.एस.काळेल, असोसिएशनचे रावेर तालुकाध्यक्ष सुनील कोंडे, कृषी व्यापारी चंद्रकांत अग्रवाल, संघटनेचे खजिनदार डॉ.गोवर्धन बोंडे, कृषी विभागाचे सी.टी.माळी, राहुल पाटील, सुनील कुलकर्णी, भगवान महाजन, चौधरी सर, वामनराव पाटील, सुनील महाजन,पंकज बोरा आदी उपस्थित होते.यावेळी तालुका डीलर्स असोसिएशन चे अध्यक्ष सुनील कोंडे यांनी मनोगत व्यक्त केले.
कृषी क्षेत्राची अपरीमित हानी ; विक्रेत्यांनी दुकाने ठेवली बंद
फुंंडकर यांच्या निधनाने कृषी क्षेत्राची अपरीमित हानी झाल्याची भावना व्यक्त झाली. गतवर्षी फुंडकर यांनी अडचणीच्या काळात विक्रेत्यांच्या भावना जाणत विनाकारण होणार्या कारवाईस स्थगिती दिली होती, असेही विक्रेत्यांनी प्रसंगी सांगितले. शेतकर्यांचा वाली गेल्याचीही भावना व्यक्त करण्यात आली. यावेळी तालुकभरातून विक्रेते उपस्थित होते. गुरुवारी दुपारी 12 ते दोन या काळात रावेर, सावदा, निंभोरा, ऐनपूर, निंबोल, खानापूर, खिर्डी यासह संपूर्ण तालुक्यातील कृषी विक्रेत्यांनी आपली दुकाने बंद ठेवली.