कृषी, यंत्रमाग ग्राहकांना वीजदरात सवलत 

0

मुंबई – कृषी आणि यंत्रमाग ग्राहकांना 2017-18 या आर्थिक वर्षात वीज दरात दिलेल्या सवलतीसाठी महावितरण कंपनीला देय असलेली 400 कोटी अनुदानाची रक्कम समायोजनाने वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.

कृषी व यंत्रमाग ग्राहकांना शासनाच्या धोरणानुसार सवलती देण्यासाठी महावितरणला 4500 कोटी रक्कम मंजूर करण्यात आली. यापैकी 400 कोटी समायोजनाने वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. समायोजनेद्वारे वितरित करावयाची रक्कम महावितरण कंपनीस रोख न देता विजेवरील कर व खर्चापोटी फेब्रुवारी 2017 पर्यंत समायोजन करण्यात आली असून मार्च 2017 ची 400 कोटी शासनास येणे असलेली रक्कम वसूल करण्यात यावी. त्याचप्रमाणे सन 2016-17 मधील विद्युत शुल्कापोटी समायोजित करावयाची रक्कम 350 कोटी व सन 2016 – 17 मधील विजेच्या विक्रीकारावरील समायोजित करावयाची रक्कम 50कोटी रूपयांचे पुस्तकी समायोजन महालेखापाल, मुंबई यांच्या अखत्यारीत व अधिकारात करण्यात येत असल्याने 400 कोटी रकमेचे देयक तयार करू नये, असेही शासनाने आपल्या आदेशात म्हटले आहे.