परभणी : दुष्काळी परिस्थितीत टोमॅटोला किरकोळ भाव मिळत असल्याने आणि राज्य सरकारकडून उपाययोजना होत नसल्याने बुधवारी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीसमोर टोमॅटो फेकून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शासनाच्या धोरणाचा निषेध केला. शहरातील बसस्थानक जवळ असणाऱ्या उड्डाणपूल भागात दुपारी साधारणत: २ : ४५ च्या सुमारास ही घटना घडली. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभासाठी खोत बुधवारी परभणी येथे आले होते.