मुंबई: राज्यातील कृषि विद्यापीठांमधील बंद झालेला कृषी तांत्रिक पदविका अभ्यासक्रम पुन्हा सुरू करण्याबाबत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आले असून,महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने हा अभ्यासक्रम पूर्ववत करण्याबाबत शिक्कामोर्तब केले आहे. प्रशासनाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा विचार न करता हा अभ्यासक्रम बंद केला होता. एकिकडे सरकार कौशल्य विकासाचे ढोल बडवत असताना दुसरीकडे शेतीशी निगडीत हा अभ्यासक्रम बंद झाल्याने विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणापासून वंचित रहावे लागणार होते.
हे देखील वाचा
स्व. पांडुरंग फुंडकर यांनी दिले होते आश्वासन
विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता विखे पाटील यांनी तातडीने तत्कालीन कृषीमंत्री स्व. पांडुरंग फुंडकर यांच्याशी संपर्क साधून हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. या निर्णयामुळे होणारे प्रतिकूल परिणाम निदर्शनास आणून दिल्यानंतर फुंडकर यांनी हा अभ्यासक्रम पूर्ववत करण्याचे आश्वासनही दिले होते. मात्र, दुर्दैवाने त्यांचे अकाली निधन झाले.

त्यानंतर कृषि विभागाची जबाबदारी सोपवण्यात आलेले मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाठपुरावा सुरूच ठेवला. दरम्यान, ‘असोसिएशन ऑफ अॅग्री अॅंड अॅग्रो अलाईड कॉलेजेस’ या संघटनेनेही मुंबई येथे कृषीमंत्र्यांची भेट घेऊन या निर्णयामुळे ग्रामीण भागावर होणाऱ्या परिणामांची माहिती दिली. अखेरमहाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने कृषी विद्यापीठांमधील हा अभ्यासक्रम पूर्ववत करण्याच्या निर्णयावर मोहर लावली असून, त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.