कृषी विधेयकाविरोधात आज ‘भारत बंद’

0

नवी दिल्ली: केंद्र सरकारनेया अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सभागृहात बहुमताने कृषी विषयक तीन विधेयक मंजूर केले. मात्र या विधेयकाविरोधात शेतकरी आणि विरोधी पक्ष आक्रमक झाले आहे. सरकारने हे विधेयक मागे घ्यावे या मागणीसाठी आज शुक्रवारी २५ रोजी ‘भारत बंद’ची हाक देण्यात आली आहे. सरकारने बहुमताच्या जोरावर संसदेत कृषी विधेयके मंजूर केली असली तरी ते शेतकरी विरोधी आहेत अशी भूमिका घेत अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने आज ‘भारत बंद ‘ची हाक दिली आहे. या बंदमध्ये देशभरातील विविध शेतकरी संघटना, राजकीय पक्ष आणि शेतकरी सहभागी झाले आहेत. अकाली दल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह विविध शेतकरी संघटना आणि राजकीय पक्षाने या बंदला पाठींबा दिला आहे.

भारत बंदच्या पार्श्वभूमीवर पंजाबमधील किसान मजदूर संघर्ष समिती आक्रमक झाली असून आज सकाळपासून अमृतसरमध्ये रेल रोको आंदोलन सुरू आहे.