कडूस : कृषी विभाग व बॉश इंडिया फाउंडेशनच्या वतीने गारगोटवाडी, कोहिडे बुद्रुक, रौधळवाडी या गावांमध्ये वृक्षवाटप करण्यात आले. शाळेच्या आवारात वृक्ष, फळझाडे लावण्यात आली. एकूण 1200 झाडे वाटप करण्यात आली. तसेच गारगोटवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये ई-लर्निंग संगणक कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी फाउंडेशनचे मोहन पाटील यांच्या हस्ते वृक्षवाटप करण्यात आले. यावेळी खेड तालुका मंडल कृषी अधिकारी चासकर, कृषी सहाय्यक ज्योती राक्षे, बॉश इंडिया फाउंडेशनचे गणेश कुटे, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष खेड तालुका प्रमुख दत्ता कंद, गारगोटवाडी सरपंच चांगुणाबाई गारगोटे, उपसरपंच जितेंद्र काळोखे, ग्रामसेविका पुुनम शेवाळे व इतर सदस्य तसेच गारगोटवाडीतील लाभार्थी, शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.