रावेर । कृषी संजीवनी योजना फसवी असून त्यात शेतकर्यांच्या वीज बिलाचे दंड व व्याजच माफ केले जात आहे त्याऐवजी वीज बिलात 50 टक्के सूट द्यावी तसेच एकाच हॉर्सपॉवर मोटरचे समान बिल मिळावे या मागणीसाठी शेतकर्यांनी शुक्रवारी नायब तहसीलदार सी.एच.पाटील यांना निवेदन देण्यात आले.
यांची होती उपस्थिती
शेतकर्यांच्या निवेदनाचा आशय असा की, मोरगांव उपकेंद्राचे विभाजन करून खिरवड करावे, जून ते ऑगस्ट दरम्यान वीज देयक रद्द करावे आदी मागण्या शेतकर्यांनी केल्या होत्या. प्रसंगी पंचायत समिती सदस्य योगेश पाटील, खिरवड सरपंच नीळकंठ चौधरी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सोपान पाटील संभाजी बिग्रेट तालुकाध्यक्ष विलास ताठे, जिजाबराव पाटील, विनोद चौधरी, राजेंद्र चौधरी, डी.डी.वाणी, संतोष चौधरी, भाऊराव चौधरी, देविदास चौधरी, भास्कर लासुरकर, यशवंत पाटील, रमेश प्रजापती, यशवंत पाटील, अशोक हिवराळे शे.शकील शे. रजाक, संदीप वाघ, रवींद्र पाटील यांच्यासह खिरवळ, नेहते, दोधे, मोरगांव, अजनाड, धुरखेडा परीसरातील शेतकर्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.