कृष्णानगरमधून महाविद्यालयीन तरुण बेपत्ता

0

पिंपरी : कॉलेजमध्ये जातो असे सांगून बाहेर पडलेला वैभव पांडुरंग बिराजदार (वय 17, रा. कृष्णानगर, चिंचवड) हा विद्यार्थी बेपत्ता झाला आहे. ही घटना कृष्णानगर चिंचवड येथे सोमवारी (दि.20) सकाळी सातच्या सुमारास घडली. रात्री उशीरापर्यंत तो घरी परतला नसल्याने घरच्यांनी त्याच्या मित्र, वर्गशिक्षक आणि इतरत्र त्याचा शोध घेतला. परंतु त्याचा ठावठिकाणा नसल्याने त्याचे वडील पांडुरंग बिराजदार यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.