भुसावळातील ज्येष्ठ नागरीक संघाच्या कॅण्डल मार्चमध्ये पाकिस्तानविरोधी घोषणाबाजी ; ठिकठिकाणी विश्वशांतीसाठी प्रार्थना
भुसावळ- पुलवामा हल्ल्याचे पडसात भुसावळ विभागात कायम असून दहशतवाद्यांना पोसणार्या पाकिस्तानचा आता भारताने बदला घ्यावा, अशी मागणी ठिकठिकाणी शहिदानां वाहिल्या जाणार्या श्रद्धांजली कार्यक्रमातून व्यक्त होत आहे. भुसावळातील ज्येष्ठ नागरीक संघाच्या कॅण्डल मार्चमध्ये पाकिस्तानविरोधी घोषणाबाजी करण्यात आली तसेच शहरात सर्वपर्क्षीय रॅली काढॅन नागरीकांनीदेखील श्रद्धांजली वाहिली.
खळवाडी वेडीमाता ज्येष्ठ नागरीक संघातर्फे श्रद्धांजली
भुसावळ- शहरातील खळवाडी वेडीमाता ज्येष्ठ नागरीक संघातर्फे शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅण्डल मार्च नुकताच काढण्यात आला. सर्व ज्येष्ठ सभासद, तरुण, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कॅण्डल मार्चला वेडिमाता मंदिरापासून सुरुवात झाली तर नरेंद्र महाजन यांच्या स्मारकापर्यंत रॅली काढण्यात आली. रॅलीत पाकिस्तानविरोधी घोषणा देण्यात आल्या. प्रसंगी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. रॅलीत ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष दत्तात्रय ढाके, उपाध्यक्ष सीताराम भंगाळे, वसंत पाटील, अनिल भोळे, प्रतिभा पाटील, दिनेश भंगाळे, यतीन ढाके आदींची उपस्थिती होती.
सर्वधर्मीय बांधवांतर्फे आदरांजली
भुसावळ- गणेश हॉटेल चौकाजवळील प्रांगणात नवज्योती मंडळ व शनी मंदिर वॉर्डातील व शहरातील सर्वजाती धर्मातील बांधवांनी शहिदांना श्रद्धांजली वाहिली. विश्वशांतीसाठी प्रार्थना म्हणण्यात आली. पं.रामगोपाल शर्मा, मो.मुन्वर खान, जे.बी.कोटेचा, फिरोज खान, दिलीप टाक, फकरुद्दीन बोहरी, सलमान पिंजारी, फारूक बागवान, ताराचंद परदेशी, शेख बबलू माळी, यांच्यासह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावल शहीद जवानांना श्रद्धांजली
यावल – नॅशनल एज्यु.सोसायटी संचलित डॉ.जाकीर हुसेन उर्दू हायस्कुल व ज्यु.कॉलेजमध्ये पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. अध्यक्षस्थानी चेअरमन हाजी इब्राहीम सेठ होते. प्री प्रायमरी शाळेचे चेअरमन अय्युब खान हमीद खान प्रमुख पाहुणे हौते. शिक्षकांपैकी महेमुद खान, ताहेर कुरेशी मुश्ताक शेख, प्राचार्य रहीम रजा यांनी मार्गदर्शन केले. गुलाम गौस खान व विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन नईम शेख यांनी केले.
रेल्वे तिकीट तपासणी संघटनेतर्फे श्रद्धांजली
भुसावळ- रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक चारवरील टीटीई लॉबीत इंडियन रेल्वे तिकीट चेकिंग स्टाफ ऑर्गनायजेशन भुसावळ मंडळतर्फे पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रसंगी डीसीटीआय एच.एस.आलूवालिया, एन.पी.पवार, सत्यजीत सेतूमाधवन, डी.एस.कापगते, एस.बी.खरात, बी.एस.महाजन, ए.पी.भालेराव, एस.एस.गोरले, वाय.व्ही.पाटील, ओ.पी.भारती, एन.बी.राठोड, दीपक दहातोंडे, रफिक कादर, पुष्पा पांडे, ज्योती निकम यांच्यासह संघटनेचे विभागीय अध्यक्ष ए.पी.धांडे, सचिव निसार खान, कार्याध्यक्ष व्हीवीयन रॉड्रिक्स, कोषाध्यक्ष व्ही.के.सचान, संघटन सचिव दयाराम सिंह, उपाध्यक्षा फरजाना अंजुम यांच्यासह तिकीट तपासणी कर्मचारी उपस्थित होते. आभार सचिव निसार खान यांनी मानले.
शहिदांना आदरांजली आणि शिवरायांना अभिवादन
भुसावळ- पुलवामा येथे झालेल्या अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यातील शहीद जवानांना आदरांजली आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादनाचा कार्यक्रम ज्ञानासह मनोरंजन ग्रुपतर्फे पार पडला. प्रारंभी ज्येष्ठ सदस्य प्रा.दिलीप ललवाणी यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. प्रास्ताविक मनीषा ताडेकर यांनी केले. शैलेंद्र वासकर, प्रा.दिलीप ललवाणी, किरण वाणी, योगेश इंगळे, प्रमोद आठवले, संजय ताडेकर, अमितकुमार पाटील, हेमांगिनी चौधरी, अमित चौधरी, प्रा. पंकज पाटील, मनीषा ताडेकर, डॉ.जगदीश पाटील यांनी मनोगत व्यक्त करून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. त्यानंतर ज्ञानासह मनोरंजन गृप प्रमुख डॉ. जगदीश पाटील यांनी श्लोक म्हणून शहिदांना आदरांजली वाहिली. यावेळी निलेश गोरे, शैलेंद्र महाजन, अशोक तायडे, प्रशांत ढाके, अमोल दांदळे, प्रा. चंद्रकांत बोरोले, मुख्याध्यापक जनार्दन राणे, युवराज झोपे, खिलचंद पाटील, कैलास तांबट, जीवन महाजन, रोहिदास सोनवणे, सौ. स्नेहल वाणी, सौ. निशा पाटील, हिमांशू चौधरी, भक्ती पाटील आदी उपस्थित होते. आभार डॉ.जगदीश पाटील यांनी मानले.
500 पणत्या लावून श्रद्धांजली
भुसावळ- दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना शहरातील नाहाटा चौफुली जवळील शहिद शिंदे यांच्या स्मारकाजवळ 500 पणत्या लावुन भावपुर्ण श्रध्दाजंली वाहण्यात आली. पाकिस्तानविरोधी प्रसंगी घोषणा देण्यात आल्या.