कॅनडात आढळले पक्षासारखे दिसणारे डोयनोसॉर

0

क्युरीज अलबर्टा हंटर नावाचा एक प्राणी ७ कोटी वर्षापूर्वी पृथ्वीवर होता. रेड डीअर नदीच्या खोऱ्यात तो दोन पायांवर फिरायचा आणि त्याला पिसे होते. तो मांस आणि वनस्पती खात असे. दोन मीटर लांबी आणि ६० किलो वजन असलेल्या या प्राण्याबद्दल कॅनेडियन जर्नल ऑफ अर्थ सायन्स या संशोधन पत्रिकेत छापून आले होते. तो दुसरातिसरा कुणी नसून डायनोसॉगड होता, असे आता लक्षात आले आहे.

जीवाश्मांवरून सजीवांच्या अस्तित्वाचा वेध घेणारे अश्मशास्त्रज्ञ या प्राण्याच्या अवशेषांवरून ट्रूडॉन या हुषार डायनोसॉरशी नाते सांगणारा हा प्राणी असेल असा कयास बांधीत होते. त्याच्या हाडांचा अभ्यास केल्यावर मात्र ही वेगळीच प्रजाती असल्याचे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. पिसे असणारा हा डायनोसॉर असल्याची त्यांची खात्री झाली.

रॉयल ऑन्टॅरिओ म्युझियमचे डॉ. डेव्हीड इव्हान्स म्हणतात, कवटीचा भाग सापडल्याने आम्ही अलबर्टा हंटर नवी प्रजाती असल्याच्या निष्कर्षाकडे वळलो. त्याचा संपूर्ण सांगाडा भविष्यात सापडेल. या सुंदर प्राण्याची शारिरीक ठेवण पुढे स्पष्ट होईल.

चित्रकाराला वर्णन सांगितले तर तो एक पक्षी चितारेल. त्याला आखूड पंख असतील पण तो महाकाय असेल. जुरासिक पार्कमधील डायनोसॉर व्हेलोसिरेपेटर सारखे करवतीसारखे दात असतील. कॅनेडियन भूअश्मशास्त्रज्ञ डॉ. फिलिप क्युरी यांच्या नावावरून त्याला नाव दिलंय ते म्हणजे अल्बर्टाव्हेनेटर क्युरी. अल्बर्टाव्हेनेटरचे अवशेष १९८० च्या दशकात सापडले होते. आतापर्यंत तो डायनोसॉर असेल अशी कल्पनाच कुणाला आली नव्हती.