कॅनडात नोकरीचे आमिष देत महिलेला 60 हजारांत गंडविले

0

पतीच्या नोकरीसाठी महिलेचे प्रयत्न फसले ; रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव- पतीला विदेशात म्हणजेच कॅनडा येथे नोकरी लावून देण्याचे आमिष देत मुंबईच्या भामट्याने शहरातील वर्धमाननगरातील किर्ती प्रविण पगारीया रा. वर्धमान नगर, यांना 60 हजार रुपयांत गंडा घातल्याची घटना समोर आली. 30 एप्रिल 2019 ते 31 मे 2019 दरम्यान घडलेल्या या घटनेप्रकरणी गुरुवारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात शैलेश छेडा रा. अंधेरी, पश्‍चिम मुंबई याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

मुंबईला ऑफिसात भेटायला बोलाविले
शहरातील सागरपार्क परिसरात वर्धमाननगर येथे किर्ती ह्या पती प्रविण पगारीया तसेच आई वडीलांसह राहतात. त्या जळगाव येथे खाजगी नोकरी करतात. त्यांचे अहमदनगर येथील परिचित स्वप्निल मुथा यांनी एप्रिल महिन्यात किर्ती यांना शैलेश छेडा नामक व्यक्ती लोकांना विदेशात नोकरी लावून देतात असे सांगितले. व त्यानुसार किर्ती यांना व्हाटस्अ‍ॅप नंबरवर शैलेश छेडा यांने मुंबई येथील ट्रायबल इंटरनॅशनल कंपनीत पैसे भरुन नोकरी मिळवून देण्याबाबत संदेश तसेच जाहीराती पाठविण्यास सुरुवात केली. यानंतर कॅनडात नोकरी मिळवून देण्यात आश्‍वासन देत मुंबई येथे ऑफिसात भेटण्याचे सांगितले.

कागदपत्रासह पैशांचीही केली मागणी
ऑफिसात भेट घेतल्यावर छेडा योन कागदपत्रांची मागणी केली. यानुसार प्रविण पगारीया यांनी कागदपत्रे पुरविले. व यानंतर सदर कामासाठी 60 हजार रुपये कंपनीत भरण्याचे सांगितले. त्यानुसार 31 मे रोजी पगारीया यांनी छेडा याने दिलेल्या कंपनीच्या स्टेट बँकेच्या अकॉउंटवर 60 हजार रुपये एनईएफटी व्दारे भरले. यानंतर पगारीया ना 15 दिवसांनी ट्रायबल इंटरनॅशनल कंपनी क्रिस्टल प्लाझा, इन्फिनिटी मल, न्यु.लिंक रोड अंधेरी पश्‍चित मुंबई याचे कडून पैसे भरल्याची पावती, कंपनीच्या अटीशर्तीबाबतचे पत्र प्राप्त झाले. यानंतर छेडा यांना फोनवरुन नोकरीबाबत विचारले असता, त्याने उडवाउडवीचे उत्तरे देण्यात सुरुवात केली. अनेकदा याचप्रकारे उत्तरे मिळाल्यावर फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर किर्ती पगारीया यांनी गुरुवारी शैलेश छेडा विरोधात फसवणूक केल्याची तक्रार दिली.