चोपडा । शहरातील सुरजदेवी सोहनराज टाटीया यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ’अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघ’ व ’चोपडा सिटी फौंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील उपजिल्हा रुग्णालयात मिशन कॅन्सर कंट्रोल इंडिया अंतर्गत कॅन्सर शोधा, कॅन्सर मिटवा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कर्करोग निदान शिबिरात सात प्रकारच्या चाचण्या करण्यात आल्या. कोल्हापूर येथील ’अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघ’ या सामाजिक संस्थेने तयार केलेल्या सुसज्ज मोबाईल बसमध्ये असणार्या प्रयोग शाळेत तज्ञांकडून या चाचण्या करण्यात आल्या. यात मुख, स्तन, गर्भाशय, जठर इतर संशयित गाठींच्या तपासणी करण्यात आल्या. या शिबिरात सुमारे 200 रुग्णांची तपासणी करण्यात आली. उमाकांत उपाध्याय, पंकज दास, प्रेमलता राघव, रवींद्र दिक्षित यांनी तपासणी कार्य केले.
यांची लाभली उपस्थिती
शिबिराचे उद्घाटन तहसीलदार दिपक गिरासे यांच्या हस्ते झाली. डॉ.विकास हरताळकर, डॉ.मनोज पाटील, डॉ. राजेंद्र भाटीया, डॉ.विनीत हरताळकर, डॉ.अमित हरताळकर, सोहनराज टाटीया, व्ही.सी.गुजराथी, भरतसिंग राजपूत, ज्येष्ठ कवी अशोक सोनवणे, तिलकभाई शहा, प्रा.डॉ.सुरेशचंद अलीझाड यांची विशेष उपस्थिती लाभली. प्रास्ताविक सुशील टाटीया यांनी तर आभार अजय पालीवाल यांनी केले. राज सिकलगर, दिपक गिरासे, डॉ.शामकांत पाथरवट, डॉ.रुपाली पाटील, डॉ.स्वप्ना पाटील, डॉ.गुरुप्रसाद वाघ, डॉ.पंकज पाटील, डॉ.नरेंद्र अग्रवाल यांनी तपासणी केली. यशस्वीतेसाठी जितेंद्र विसपुते, सुनील पाटील, डॉ.धर्मेंद्र राजपूत, सुनील सोनगिरे, स्वप्नील महाजन, मनोज अग्रवाल, सी.ए.तेजस जैन, संजय श्रावगी, प्रवीण राखेचा, महावीर टाटीया, दिव्यांक सावंत, लखन गुरव, विपिन जैन, चंद्रकांत जैन, धीरेंद्र डाकलिया यांनी परिश्रम घेतले.