कॅप्टनकुल धोनीचे नाव पाकिस्तानी क्रिकेट जर्सीवर

0

मेलबर्न : मेलबर्नमध्ये पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियामध्ये पार पडलेल्या बॉक्सिंग डे टेस्टदरम्यान असाच पाकिस्तानच्या एका चाहत्याने पाकिस्तानी क्रिकेट संघाची जर्सी घातली होती, मात्र त्यावर महेंद्रसिंग धोनीचे नाव असल्याने धोनीच्या प्रसिद्धीची प्रचीती आली. धोनीचे चाहते फक्त भारतात नाही तर जगभरात आहेत. भारतात धोनीचे करोडो चाहते आहेत, पाकिस्तानमध्येही त्याचे अनेक चाहते आहेत. स्टेडिअममधील उपस्थितांची नजर जेव्हा त्याच्यावर पडली तेव्हा सगळ्यांसाठी तो एक चर्चेचा विषय ठरला. सोशल मीडियावर सध्या त्याचे फोटो व्हायरल होत आहेत.

धोनीचा हा चाहता पाकिस्तानची जर्सी घालून फिरत होता. पण त्यावर धोनीचे नाव व धोनीच्या जर्सीवर असणार सात क्रमांकही लिहिला होता. महत्वाचं म्हणजे पठाणकोट आणि उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत – पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. याअगोदरही पाकिस्तानात विराट कोहलीच्या एका चाहत्याला जेलची हवा खावी लागली होतो. आपल्या घरावर तिरंगा फडकावल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. पाकिस्तानी क्रिकेटर शाहीद अफ्रिदीच्या एका चाहत्याला भारतात अटक झाली होती. पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेज मुशर्रफदेखील महेंद्रसिंग धोनीचे चाहते आहेत.