कॅप्टन मृत्युंजय धवन प्रकरण थेट शरद पवारांच्या दरबारात

0

उरण : स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या नोकरभरतीतला प्रमुख अडसर असलेल्या कॅप्टन मृत्युंजय धवनला काढून टाकण्यात सिंगापुर पोर्टचे सुरेश अमिराप्पो आणि दादा जगताप यांनी चालढकलपणा चालविला असल्या बाबत थेट तक्रार राष्ट्रवादीचे रायगड जिल्हा सरचिटणीस प्रशांत पाटील यांनी शरद होवार यांच्या उपास्थितीत केली आहे. वादातीत मृत्युंजय धवन याच्यासह त्यानेच भरलेले परप्रातीय भरलेले 40 कामगार अजून काढलेले नाहीत या विषयावर शरद पवार यांनी जेएनपीटी अध्यक्ष अनिल दिग्गीकर आणि सुरेश अमिराप्पो यांची संयुक्त बेथक राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्या समोर बोलावली होती.

या बैठकिला जिल्हा सरचिटणीस प्रशांत पाटील यांच्यासह तालुका अध्यक्ष मनोज भगत, विधानसभा मतदार संघाच्या अध्यक्षा भावना घाणेकर आदी उपस्थित होते या बैठकीत शरद पवारांनी ही कॅप्टन धवन आणि परप्रांतिय 40 कामगारांना त्वरित काढून त्या ठिकाणे स्थानिक 18 गावातील प्रकल्प ग्रस्तांना प्राधान्य देण्यात यावे आणि बंदरातील कामे ही स्थानिकांना देण्याबाबत अधिकारी वर्गाला सुचविले आहे.