कॅबिनेट मंत्रिमंडळाची लिस्ट घेऊन कमलनाथ जाणार दिल्लीला !

0

भोपाळ-मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदाच्या निवडीनंतर आता कॅबिनेट मंत्रिमंडळ निवडीची प्रतिक्षा आहे. आज संध्याकाळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ राज्यपाल आनंदी बेन पटेल यांची भेट घेणार असून त्यांना मंत्रिमंडळ गठन करण्याबाबत माहिती देणार आहे.

दोन-तीन दिवसात मंत्रिमंडळ नियुक्ती केली जाणार आहे. तत्पूर्वी कमलनाथ पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी मंत्रिमंडळाबाबत चर्चा करणार आहे.