स्मार्टफोन क्रांतीमुळे आपले अख्खे विश्वच बदलले आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संपूर्ण जगाशी जोडून ठेवण्याचे त्याचे नेमलेले काम स्मार्ट फोन जरी करीत असला तरी त्याच्यामुळे अनेक नव्या धाटणीच्या कॅमेर्यांना अस्तित्व प्राप्त झाले. उच्च दर्जाच्या कॅमेरा अनुभवामुळे सध्याच्या आयुष्यात आनंददायी बदल घडून येतो. स्मार्टफोन ब्रॅण्ड्सीनी हे पटकन ओळखले की आपला परफेक्ट ‘सेल्फी’ यावा यासाठी लोक वेळ खर्च करतात आणि आपल्या फोटोंमधल्या बारीकसारीक तपशिलांबाबत ते खूप आग्रही असतात. म्हणूनच सेल्फीप्रेमींना आपल्याकडे आकर्षति करण्यासाठी बहुतेक सर्वच स्मार्टफोन कंपन्यांमध्ये क्रांतिकारी फ्रंटफेसिंग कॅमेरे बाजारात आणण्यासाठी जणू स्पर्धाच लागलेली दिसते.
15 व्या शतकात मोझिया चिनी तत्त्ववेत्त्याने पिनहोल कॅमेर्याची ओळख करून दिली. या बाबीला आता बराच काळ लोटला आहे. ही संकल्पना तेव्हा ‘कॅमेरा ऑब्स्क्युरा’नावाने ओळखली जाई. लॅटिनमधला त्याचा अर्थ आहे, ‘डार्करूम’. या माहिती आणि शोधामुळे जग कायमचे बदलून गेले. त्यानंतर स्मृतींना फोटोंमध्ये बंद करण्याची जी पद्धत निघाली त्याने संपूर्ण जगाचा चेहरामोहराच बदलून टाकला. प्रत्येकालाच त्यात सामील व्हायचे होते. पारंपरिक कॅमेर्याने आत्तापर्यंत बराच मोठा पल्ला गाठला आहे आणि आता त्याचा दुहेरी वापर केला जातो. व्यावसायिक फोटोग्राफर्स अर्थातच तुम्हाला सांगतील की, आठवणी जपण्यासाठी आणि पुरस्कारयोग्य फोटोंसाठी एसएलआर किंवा डी-एसएलआर कॅमेरा घेणे योग्य आहे. परंतु मग, एखादी सामान्य व्यक्ती ज्यांना केवळ आत्मानंदासाठी फोटो काढायचे आहेत, त्यांचे काय?
स्मार्टफोन कॅमेर्यातून ज्या प्रकारचे आणि ज्या दर्जाचे फोटो काढू शकतो, याचा विचारही केला तर आचंबित व्हायला होते. या कॅमेर्यांच्या जगतात लागत असलेल्या विविध शोधामधले तंत्रज्ञान आश्चर्यचकित करते आणि तेच फोटोग्राफीत आवड असणार्यांना आणि तांत्रिक बाबींमधल्या तज्ज्ञांना आकर्षति करते. फोटो काढण्याची पारंपरिक पद्धतच मोडीत काढणार्या या अद्वितीय शोधांमुळे फोटोग्राफीमध्ये नवी ‘सेल्फी’ पिढी उदयाला आली आहे. आज कॅमेरा हे प्रत्येकाचे वैयक्तिक उपकरण बनले आहे. ‘फोटो काढा आणि तात्काळ शेअर करा’ ही मानसिकता बनली आहे. हे शेअरिंग अर्थातच कुटुंबीय आणि मित्रमंडळींबरोबर केले जाते. हा आता जगण्याचाच एक भाग बनला आहे. आपले अनुभव लोकांबरोबर वाटण्याची तीव्र इच्छाच ‘सेल्फी’मागे असते. सातासमुद्रपलीकडे असणार्या नातेवाईकांना आपली खुशाली कळवण्याचा हा उत्तम मार्ग आहे. सोशल मीडियामुळे नुकताच काढलेला फोटो तात्काळ आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवता येतो. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि चांगल्या रेझोल्युशनने सज्ज असणार्या फ्रंट कॅमेर्याची वाढती मागणी पाहता अनेक स्मार्टफोन उत्पादक स्मार्टफोनची अधिक चांगली आवृत्ती आणण्यावर विचार करण्यास प्रवृत्त झाले आहेत.
स्मार्टफोन फोटोग्राफी अधिक दर्जेदार बनवण्यासाठी आपले उत्तमोत्तम स्रोत पणास लावणार्या एका स्मार्टफोन निर्मात्या कंपनीने फ्रंटकॅमेराबाबतचे सगळे अडथळे दूर केले आहेत. या कंपनीने नुकताच आपला नवा फोन सादर केला आहे, ज्यामुळे सेल्फी काढण्याची संकल्पनाच आमूलाग्र बदलून गेली आहे. जेव्हा जेव्हा या फोनमधून सेल्फी काढली जाईल, तेव्हा तेव्हा यातले ब्युटिफिकेशन सॉफ्टवेअर आपली जादू दाखवील आणि तुम्हाला तेजस्वी, नितळ आणि नसगक लुक प्रदान करील. ही उत्सुकता आणखी वाढेल, ती फ्रंट कॅमेर्याच्या फीचर्समध्ये नव्याने येऊन जोडलेल्या वैशिष्ट्यांंमुळे. त्यासोबत खास डिझाइन केलेलं फ्लॅश तंत्रज्ञानही आहे. कंपनीच्या या शोधामुळे इतर स्पर्धक कंपन्यांना आपलं डोके अधिक खाजवावे लागेल, यात शंकाच नाही.
– सुनील आढाव
कला संपादक,‘जनशक्ति’
7767012211