कॅरीबॅग बाळगणार्‍या दुकानदारांवर कारवाई

0

जळगाव। प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी यनीट क्र. 11 व 12 येथे बुधवारी पहाणी करून प्लास्टीक कॅरीबॅग बाळगणार्‍या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केली. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील, ए. एन. नेमाडे, एस. पी. अत्तरदे, मुख्य स्वच्छता निरीक्षक यु. आर. इंगळे, आरोग्य निरिक्षक आर. व्ही. कांबळे, युनीट प्रमुख यशवंत काळे, दिपक भावसार, मालती रंधे, शंकर अंभोरे, संभाजी देवरे, प्रविण पवार, नंदु पाटील, मोकादम आदी त्यांच्या सोबत होते. या पहाणीत रामदास कॉलनी येथील सुभाष चुन्नीलाल भावसार व मनोज टी स्टॉल यांनी कचरा उघड्यावर टाकल्याने दोघांकडून प्रत्येकी 200 रूपयांचा दंड आकारण्यात आला.

सावरीया स्वीट मार्ट येथे 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीक पिशव्या वापरण्यात येत असल्याचे आढळून आल्याने 900 रूपयांचा दंड आकारण्यात आला. रामानंद नगर रोडवरील भाजी विक्रेते, फळ विके्रते यांचेकडील 5 ते 7 किलो प्लास्टीक कॅरीबॅग 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या जप्त करण्यात आल्या. तसेच डॉ. संजय बाविस्कर, कृष्णा मेडीकल, सद्गुरू मेडीकल, दिगविन मेडीकल तसेच कोर्ट परिसारातील विक्रेत्यांना प्रत्येकी 200 प्रमाणे एकूण 7 हजार 600 रूपयांचा दंड करण्यात आल.