कॅरेबियन लीगमध्ये डॅरेन ब्राव्होचा कहर

0

त्रिनिदाद । वेस्टइंडिजच्या संघातील अष्टपैलू खेळाडू डॅरेन ब्राव्होचा कॅरबियन प्रिमिअर लीगमध्ये कहर पहायला मिळाला. बुधवारी रात्री झालेल्या नेविस पॅट्रियट्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्रिबागो नाइट रायडर्स संघाकडून खेळताना डॅरेन ब्राव्होने 10 चेंडूत 38 धावा ठोकत एक जागतिक विक्रम प्रस्थापीत केला.

बाव्होने आपल्या 38 धावांमधील 36 धावांसाठी सहा षटकार खेचले. डावाची सुरूवात करताना ब्राव्होने पहिल्या तीन चेंडूंवर तीन षटकार खेचले. डॅरेनची ही खेळी विक्रमांच्या यदीथ समाविष्ठ करण्यात आली आहे. चार वर्षांपूर्वी गॅरेथ हॅपकिन्सने 39 धावांच्या खेळीत एवढे षटकार मारले होते.

ब्राव्होच्या तडाखेबंद खेळीमुळे त्रिबागो नाइट रायडर्स संघाने मोठा विजय मिळवला. नेविस पॅट्रियट्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 13 षटकांमध्ये 162 धावा केल्या होत्या. त्यानंतर पाऊस पडल्यामुळे त्रिबागो संघाला विजयासाठी 6 षटकांमध्ये 86 धावा करण्याचे आव्हान मिळाले होते. त्यानंतर ब्राव्होची तुफानी फलंदाजी आणि ब्रॅडन मॅकुलमच्या 14 चेंडूमधील 40 धावांमुळे त्रिबागो संघाचा विजय साकारला.