कॅशलेस पुरस्कारासाठी राजपूत यांची निवड

0

भुसावळ। येथील भोळे महाविद्यालयातील विद्यार्थी व रासेयो स्वयंसेवक रंजितसिंग राजपूत याची विद्यापीठस्तरीय कॅशलेस पुरस्काराची निवड झाली आहे. त्याला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे स्मृतिचिन्ह, 500 रुपये रोख व प्रमाणपत्र समारंभपुर्वक प्रदान करण्यात येईल. पुरस्कार मिळाल्याचे पत्र विद्यापीठातर्फे प्राप्त होता बरोबर रंजितसिंग याचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.पी. फालक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. आर.एम. सरोदे, प्रा. संगिता धर्माधिकारी, जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. दयाघन राणे उपस्थित होते. शासनातर्फे कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य देण्यासाठी उपक्रम राबविले जात आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांना जनजागृती करण्याचे आवाहन उमविने केले होते. त्यानुसार रंजितसिंगने बँक, आयटीआय, महाविद्यालय, परिसरात जनजागृती केली. तसेच प्रात्यक्षिक करुन कॅशलेस व्यवहार करुन दाखविले होते.