जळगाव । मोदींनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर कॅशलेस व्यवहाराला आलेली गती ही योग्य असून भविष्यात कॅशलेस व्यवहारामुळे खुप मोठा आर्थिक बदल होईल. मोठ्या नोटांच्या साठवणूकीमुळे आर्थिक विकासाला खीळ बसली होती ती कॅशलेस व्यवहारामुळे मुक्त होईल असे मत अर्थक्रांतीचे प्रमुख वक्ते दिपक करंजकर यांनी व्यक्त केले.
देशातील चलनात मोठ्या नोटांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असल्याने नोटांची साठवणूक मोठ्या प्रमाणात होत होती व त्यामुळे करचोरी मोठ्या प्रमाणात होत होती. पैसा हा वापरण्याची वस्तू असल्याने तो वापरला गेला पाहिजे. कॅशलेस व्यवहाराच्या माध्यमातून पैसा जर बँकेत खेळत राहिला तर कोणत्याही प्रकारचे कर बुडणार नाही, त्यामुळे व्याजदर कमी होणे, उद्योग धंद्यात वाढ होणे आदी बदल दिसून येतील असे मत प्रमुख भुषण पाटील यांनी वक्ते केले. ते जळगाव जनता सहकारी बँक व आशा फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने कॅशलेस इंडिया पुढे काय? या विषयावर आयोजित व्याख्यानप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते त्याप्रसंगी ते बोलत होते. आर्थिक व्यवहारांसंंबंधीची माहिती आणि कॅशलेस व्यवहाराचे धडे त्यांनी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून सादरीकरण केले.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे सहकार भारतीचे अध्यक्ष संजय बिर्ला, जळगाव जनता बँकेचे अध्यक्ष अनिलराव, जळगाव जनता बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी पुंडलीक पाटील, आशा फाऊंडेशनचे अध्यक्ष गिरीष कुलकर्णी, दिपक अट्रावलकर, आरती हुजुरबाजार, अनंत कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक गिरीश कुलकर्णी, पुडलीक पाटील यांनी केले. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे सहकार भारतीचे अध्यक्ष संजय बिर्ला होते.