रावेर। कॅशलेश व्यवहार करुन सर्वसामान्य जनतेनं वेळेची बचत करावी. केंद्र शासनाच्या या डिजिटल योजनांचा लाभ घ्यावा, शहर ते खेड्यापर्यंत मोबाईल बँकींग जाणून घेऊन प्रत्येक व्यवहार कॅशलेश करा, भीम अॅप डाऊनलोड करुन त्याचा उपयोग करा आवाहन असे तहसीलदार विजयकुमार ढगे यांनी केले. तहसील कार्यालयात डिजिटल बँकींग विषयी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार हरिभाऊ जावळे होते.
कार्यक्रमास यांची होती प्रमुख उपस्थिती
याप्रसंगी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, नराध्यक्ष दारा मोहम्मद, उपनगराध्यक्ष सुधीर पाटील, पंचायत समिती सभापती माधुरी नेमाडे, उपसभापती अनिता चौधरी, जिल्हा परिषद सदस्या नंदा पाटील, सुरेखा पाटील, रंजना पाटील, आत्माराम कोळी, माजी आरोग्य सभापती सुरेश धनके, भाजपा तालुकाध्यक्ष सुनिल पाटील, पंचातय समिती सदस्य जितेंद्र पाटील, पी. के.महाजन, गटविकास अधिकारी सानिया नाकाडे, अशोक शिंदे, दिलीप कांबळे, बाळु शिरतुरे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, मिलिंद वायकोळे, गोपाळ नेमाडे, पोलिस निरीक्षक कैलास काळे, आर.जी. राणे, प्रल्हाद पाटील आदी उपस्थित होते.
निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण
शासनाच्या डिजिटल पेमेंट मोहिमे अंतर्गत डिजिटल व्यवहार यावर तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्याचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच डिजिटल बँकींग कशी करावी याची माहिती जळगाव येथून आलेले वैद्य यांनी दिली. यावेळी शहरातील विविध बँकेचे मँनजर उपस्थित होते. त्यांनी देखील यावेळी मार्गदर्शन केले.