कॅसियस बॉक्सींग क्लबच्या खेळाडूंची राज्यस्तरावर निवड

0

भुसावळ- विभागीय स्तरावर धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे घेण्यात आलेल्या बॉक्सींग स्पर्धेत भुसावळ येथील कॅसियस क्लबच्या दोन मुष्टीयोद्धा खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले. त्यांची राज्यस्तरीय बॉक्सींग स्पर्धेसाठी निवड झाली. या स्पर्धेत कॅसियस क्लबच्या मोनिका नवगीरे हिने 40 ते 42 वजनी गटात तर तुषार झनके याने 36 ते 38 वजनी गटात जळगाव, नाशिक व नंदुरबार येथील खेळाडूंचा पराभव करून सुवर्ण पदक पटकविल्याने त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. या खेळाडूंना क्लबचे संस्थापक तथा कोच राहुल घोडेस्वार, मुख्य प्रशिक्षक सुनील नवगिरे, मध्य रेल्वेचे एनएस कोच चुन्नीलाल गुप्ता, पवन शिरसाठ, मिलींद साळुंके, सुंदर बारसे, सुनील निकम, विजय मेढे, शहंशाह उल-हक, मेघराज तल्हारे, मनोज सुर्यवंशी, किरण कणसे, बंटी आव्हाड, संजय बांगर, संदीप वाघ, ग्रामपंचायत सदस्य विशाल खेडकर, यशवंत चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.