शहादा । शहरात केंद्रशासानाची केंद्रीय समिती येणार असल्याने नगरपालिका प्रशासनाने जय्यत तयारी सुरु केली आहे शहरातील प्रत्येक भागात रस्त्यावरील असलेळे खड्डे व पाण्याचा डबक्यांमध्ये मुरुम टाकण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. आतापर्यन्त शंभरापेक्षा जास्त डंपर खडी व मुरुम टाकण्यात आले आहे. सोबतच मंजुर करण्यात आलेले शौचालये पुर्ण करण्यात येत आहेत.
शहरवासियांमध्ये मोठ्या प्रमाणात होती नाराजी
शहरात सर्वत्र खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाले होते.शहरवासियामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती शिवाय नगरसेवकामध्ये संतप्त प्रतिक्रिया होत्या हा सारा प्रकार बघता नगराध्यक्ष मोतीलाल पाटील व त्यांचा सहकारी नगरसेवक तसेच मुख्याधिकारीनी गंभीर दखल घेवुन मुरुम टाकण्याचे काम सुरु केले. दोंडाइचा रस्ता एच. डी एफ .सी .बँक ते प्रकाशा रस्ता ,स्वामी समर्थ नगरकडील रस्ता,दिनदयाल नगर,संभाजी नगर,स्वामी विवेकानंद नगर,पटेल रेसीडेंसी ते नितीन नगर व गरीब नवाज कॉलनी परिसरात मुरुम टाकण्यात आला आहे .
निवड केल्यास एक कोटी रुपये बक्षीस
केंद्रीय समिती येणार असल्याने नुकतीच नगरपालिका प्रशासन अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली शहरातील विविध विद्यालयाच्या मुख्याध्यापकांची बैठक घेतली त्यात विद्यार्थी संख्या, सुविधा, शौचालय, मुतार्याची संख्या संगणकात अपडेट करण्यात आली आहे. केंद्रीय समितीने निवड केल्यास एक कोटी रुपये बक्षीस मिळणार आहे. शहर 100% हागणदरीमुक्त झाल्याचा दावा डॉ सुधीर गवळीनी केला आहे.
पालिकेने 40 वसाहतींची पाठविली नावे
शहादा शहर हागणदरी मुक्त करण्यात आले आहे. जिल्हा व राज्यपातळीवर निवड झाल्यानंतर केंद्रशासनाची समिती येत्या आठवड्यात येत असल्याने नगरपालिका मार्फत विविधकामांना वेग आला आहे. कमेटी सदस्य एकुण नऊ वसाहतींची पाहणी करणार आहेत. नगरपालिकेने 40 वसाहतींची नावे पाठविली आहेत.त्यापैकी काहींना समिती गोपनीयरित्या वसाहतीना भेट देतील म्हणुन खड्डे बुजवण्याचे काम जोरात सुरु आहे.