डीए आता चार वरून पाच टक्के झाला
नवी दिल्ली : केंद्र सरकारने आपल्या कर्मचारीवर्गासाठी खुशखबर दिली आहे. महागाई भत्ता (डीए)मध्ये एक टक्काने वाढ करत तो आता चारवरून पाच टक्के करण्यात आलेला आहे. त्याशिवाय, खासगी क्षेत्रातील कर्मचार्यांनाही या डीएवाढीचा फायदा द्यावा, अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे.
केंद्र सरकारचे सद्या 49.26 लाख कर्मचारी आहेत तर 61.17 लाख सेवानिवृत्त कर्मचारी आहेत, या कर्मचार्यांना या डीएवाढीचा लाभ होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पहिलीच बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. केंद्राने ग्रॅच्युईटी समायोजनाचाही निर्णय घेतला असून, सरकारच्या या निर्णयामुळे वाढत्या महागाईला आळा बसेल, अशी माहिती क्रिसिलचे मुख्य अर्थतज्ज्ञ डी. के. जोशी यांनी दिली.