मुंबई: काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. भाजपने मित्र पक्ष शिवसेनेला केंद्रात एक मंत्रिपद दिले आहे. खासदार अरविंद सावंत यांचा मंत्रिमंडळात समावेश आहे. त्यांना अवजड उद्योग मंत्रीपद देण्यात आले आहे. मिळालेल्या खात्याबाबत शिवसेना पूर्ण समाधानी आहे असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. मागील सरकारमध्ये देखील शिवसेनेला अवजड उद्योगमंत्री पद देण्यात आले होते. अनंत गीते हे अवजड उद्योग मंत्री होते. शिवसेनेला रेल्वे, उर्जा आणि नागरी उड्डाण या खात्यांची अपेक्षा होती. मात्र त्यापैकी एकही खाते न मिळाल्याने शिवसेना नाराज आहे अशा चर्चा रंगल्या असतानाच संजय राऊत यांनी अशी कोणतीही नाराजी नाही हे स्पष्ट केले आहे. एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेला जे खाते दिले.