केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेंना दिल्लीत मिळाला प्रशस्त बंगला

0

मुंबई | रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( ए ) चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांना तिन वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर नविदिल्लीत सरकारी निवासस्थान म्हणून 11 सफदरजंग येथे प्रशस्त बांगला मिळाला आहे . आता महिन्याभरात ना. आठवले यांचा मुक्काम न्यू महाराष्ट्र सदन मधून या नव्या प्रशस्त बंगल्यात होणार आहे .

काँग्रेस सोबत युती तोडल्यानंतर काँग्रेस नेतृत्वातील यु पी ए सरकार ने सन 2009 मध्ये 8 ए लोधी इस्टेट हा ना. रामदास आठवलेंचा बंगला खाली करून त्यातील सर्व सामान रोड वर फेकण्याचा उद्दामपणा केला होता . काँग्रेस सरकार ने केलेला तो हीन प्रकार देशभरातील दलित बहुजनांच्या जिव्हारी लागला होता . त्याचा धडा काँग्रेसला सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आंबेडकरी जनतेने काँग्रेसला पराभवाची धूळ चारून सत्तेच्या स्थानावरून रस्त्यावर आणले . त्यानंतर गतवर्षी सन 2016 मध्ये ना. रामदास आठवले यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाचे राज्यमंत्री पदी नियुक्ती झाली . त्यांनंतर वर्षभराने आता ना रामदास आठवले यांना सरकारी बांगला 11 सफदरजंग हा मिळाला आहे . मागील तीन वर्षात सरकारी बंगल्याविना महाराष्ट्र सदन मध्येच मुक्काम होता . आता हा मुक्काम महिन्याभरातच 11 सफदरजंग येथे हलविण्यात येणार असल्याचे ना . रामदास आठवले यांनी सांगितले .