केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची किडणी ट्रान्सप्लँटची शस्त्रक्रिया लांबणीवर

0

नवी दिल्ली । केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली सध्या डायलेसिसवर आहेत. यामुळे किडनी ट्रान्सप्लँटची शस्त्रक्रिया लांबणीवर पडली आहे. शस्त्रक्रियेसाठी आता निश्‍चित तारीख नाही. ती कधीही होऊ शकते.

जेटलींना सध्या कुणालाही भेटू दिले जात नाहीये. संसर्ग होऊ नये म्हणून डॉक्टर खूप काळजी घेता आहेत. त्यांना एम्सच्या कार्डियो-न्युरो टॉवरमध्ये ठेवण्यात आले आहे. किडनी ट्रान्सप्लँटची सर्व औपचारिकता पूर्ण झाली असून, किडनी देणार्‍याची ओळख मात्र गुप्त ठेवण्यात आली आहे.