राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल उपस्थित राहणार
हे देखील वाचा
मुंबई-राज्यात पर्यटन व्यवस्थेचे वाभाडे निघत असताना दुसरीकडे राज्य पर्यटन विभाग मात्र परदेशात आपल्या प्रसिद्धीचा सोस पुरवून घेत असल्याचे चित्र समोर आले आहे. देशातील पर्यटनाकडे परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी भारत सरकारने चीन मध्ये रोड शो करण्याचे ठरविले आहे. या रोड शोसाठी केंद्रीय पर्यटन विभागाने देशातील सर्व राज्याच्या पर्यटन विभागाला निमंत्रित केले असून महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री जयकुमार रावळ हे उपस्थित राहणार आहे. सदर रोड शो हा 28 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या दरम्यान होणार आहे.
भारत सरकारच्या पर्यटन विभागाने देशातील पर्यटनाकडे परदेशातील पर्यटकांना आकर्षित करून देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात. याचाच भाग म्हणून चीन मधील पर्यटनप्रेमींना भारतातील विविध राज्यांमध्ये असलेल्या पर्यटन स्थळाकडे आकर्षित करण्यासाठी चीन मध्ये 5 दिवसांचा रोड शो कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात सहभागी होऊन प्रत्येक राज्याच्या पर्यटन विभागाने त्या त्या राज्यातील पर्यटन स्थळांचे महत्वाचे आणि पर्यटकांना आकर्षित करण्यारे माहिती फलक, सादरीकरण आणि अन्य बाबी तयार करून या शो मध्ये ठेवण्यास विनंती केली आहे.या विनंतीवरून राज्याच्या पर्यटन विभागाने राज्यातील महत्वाचे आणि आकर्षित करणारे फलक तयार केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पर्यटक स्थानांना चालना देण्यासाठी राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल स्वतः उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.