नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केलेला अर्थसंकल्प हा पूर्ण निराशाजनक आणि गोंधळात टाकणारा असल्याचे कॉंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. मोदी सरकारचा अर्थसंकल्प हा सरळसोट नाही तर गुंतागुंतीचा आहे असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. रोजगार निर्मिती आणि अर्थव्यवस्थेची घडी बसवण्याच्या अनुषंगाने हा अर्थसंकल्प सादर होईल असं वाटलं होतं. मात्र यंदाच्या अर्थसंकल्पात कोणतीही ठोस तरतूद करण्यात आलेली नाही असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.