केंद्रीय मुद्रा योजनेला तीन वर्षे पूर्ण

0

महिला, युवावर्गाचा आत्मविश्‍वास वाढला…

नवी दिल्ली । भारत सरकारच्या मुद्रा योजनेला तीन वर्षे पूर्ण झाली. या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, महिला आणि तरुणांमध्ये उद्योगशिलता आणि स्वावलंबीपणा या बाबींना चालना देणे हा एकमेव उद्देश आहे. यामुळे उद्योगविश्‍वाला नवी उमेद मिळेल. तरुणांचा आत्मविश्‍वास द्विगुणीत होईल. विशेषतः या योजनेमुळे अनुसूचित जाती तथा मागासवर्गातील तरुण आणि महिलांना स्वावलंबी बनविण्यास ही योजना उपयुक्त ठरणार आहे.