मुंबई । रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मातोश्री दिवंगत हौसाआई बंडू आठवले यांचे निधन झाल्यानंतर सोमवारी बांद्रा पूर्व संविधान निवासस्थानी त्यांचा जलदान विधी आणि आदरांजली सभा आयोजित करण्यात आली होती. त्यास आंबेडकरी जनतेसह सर पक्षीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आठवलेंच्या बंगल्यासमोर दिवंगत माता हौसाआई आठवलेंना आदरांजली वाहणार्या सभेचे विचारमंच बांधण्यात आला होता. बौद्धभिक्खू डॉ. राहुल बोधी महाथेरो; भदंत खेमधम्मो महाथेरो यांच्यासह पूज्य भिक्खू संघाच्या उपस्थितीत दिवंगत माता हौसाआई आठवले यांचा जलदान विधी करण्यात आला. या विधीस रामदास आठवले, पत्नी सीमाताई आठवले, कु. जित आठवले सहभागी झाले होते. त्यानंतर आदरांजली सभा सुरू करण्यात आली.