केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते शिंदखेडा शहर पाणीपुरवठा योजनेचा लोकार्पण सोहळा,

सुरत पाळधी सुरू असलेली मेमो रेल्वेची सुरत भुसावल पर्यंत सुरू, गाडीला रावसाहेब दानवे यांच्या हस्ते हिरवा झेंडा.

शिदखेडा (प्रतिनिधी) माजी मंत्री व विद्यमान आमदार जयकुमार रावळ यांच्या प्रयत्नाने 22 कोटी रुपये खर्च करून पूर्ण झालेल्या शिंदखेडा शहर पाणीपुरवठा योजनेचा लोकार्पण सोहळा आज दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी अकरा वाजता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते संपन्न होत आहे. यावेळी शिंदखेडा येथील गांधी चौकात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा देखील आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पर्यटन मंत्री व आमदार जयकुमार रावळ आहेत.

या कार्यक्रमास धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीशभाऊ महाजन, माजी संरक्षण राज्यमंत्री खा.डॉ. सुभाष भामरे , माजी शिक्षण मंत्री व आमदार अमरीशभाई पटेल, शिंदखेडा शहराच्या प्रथम लोक नियुक्त नगराध्यक्षा सौ रजनी अनिल वानखेडे, माजी जि प उपाध्यक्ष कामराज निकम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष नारायण पाटील, माजी उपनगराध्यक्ष उल्हास देशमुख विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

शिंदखेडा शहराचा पाणीपुरवठा योजनेचा मुद्दा निवडणूक कोणतीही असो प्रत्येक पक्षाच्या अग्रभागी असायचा. शहराचा विस्तार पाहता शिंदखेडा शहरासाठी तापी नदी वरून कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना व्हावी अशी अनेक वर्षांपासूनची शिंदखेडाकरांची मागणी होती. माजी पर्यटन मंत्री आ‌ जयकुमार रावल यांनी विधानसभा निवडणुकीत पाणी योजना करण्याचे शिंदखेडाकरांना दिलेले आश्वासन पूर्ण केले. या पाणीपुरवठा योजनेचे काम जलद गतीने होऊन योजनेचा लोकार्पण सोहळा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना. रावसाहेब दानवे यांच्या हस्ते आज होत आहे. यावेळी राज्यमंत्री दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदखेडा येथील गांधी चौकात सकाळी 11 वाजता शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शिंदखेडा शहर पाणीपुरवठा योजनेचा लोकार्पण सोहळा व शेतकरी मेळाव्याला शहरासह तालुक्यातील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन शिंदखेडा नगरपंचायतीच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा रजनी अनिल वानखेडे व सभागृह नेते अनिल लालचंद वानखेडे यांनी केले आहे.

 

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा शिंदखेडा तालुका दौरा पुढीलप्रमाणे—

 

**सकाळी १०.३० मिनिटांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे शिंदखेडा शहरात आगमन होणार आहे.

**सकाळी ११ वाजता शिंदखेडा शहर पाणीपुरवठा योजनेचा लोकार्पण सोहळा

**दुपारी १२ वाजता शिंदखेडा शहरातील गांधी चौकात शेतकरी मेळावा

** दुपारी २ वाजता दोंडाईच्या येथील रेल्वे उड्डाणपुलाची पाहणी

दुपारी ३.३० वाजता दोंडाईचा शहरातील महादेव पुरा चौकाच्या सुशोभीकरणाचे उद्घाटन

दुपारी ४.०० वाजता दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समिती समोर राजपथावर बैलगाडी प्रतिकृतीचे अनावरण

दुपारी ४.३० वाजता जुना शहादा दोंडाईचा रोडचे भूमिपूजन

दुपारी ५.००वाजता दोंडाईचा रेल्वे स्टेशनवर विविध समस्यांबाबत रेल्वे अधिकारी व प्रवासी संघटनांची बैठक.

सायंकाळी ५.४० मिनिटांनी सुरत पाळधी सुरू असलेली मेमो रेल्वेची सुरत भुसावल पर्यंत सुरू करण्या बाबत प्रवाशांची मागणी लक्षात घेता सदरची रेल्वे सुरत भुसावल सुरू करण्यात आली असुन त्या मेमो रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखविणे.