केंद्रीय समिती जिल्ह्यात अन् जामनेरात पोषण आहाराची ‘शाळा’

0

मुख्याध्यापकांनी तांदुळाचा अपहार केल्याचा राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षांचा आरोप

जळगाव – केंद्रीय शालेय पोषण आहार समिती अचानक तपासणी करेल, या धाकामुळे जामनेरातील अंजुमन उर्दू हायस्कुलातील पेाषण आहाचा अतिरिक्त 12 क्विंटल तांदूळ बाहेर नेण्यात आलाचा प्रकार समोर आला आहे. याबाबत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जावेद मुल्लाजी यांनी तक्रार दिली आहे. रविवारी रात्री हा प्रकार घडल्याचे त्यांनी म्हटले असून मुख्याध्यापक अजगर शेख कादर यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला आहे. या अपहारासंदर्भातील एक क्लिप सोशल मीडियावर आल्याने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.

जावेद मुल्लाजी यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्राची शालेय पोषण आहार समिती शाळांवर तपासणी करण्यासाठी रविवारीच जिल्ह्यात दाखल झाली. ही समिती कोणत्याही शाळांमध्ये अचानक तपासणी करणार असल्याचे आधिच जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे या भितीपोटी जामनेरातील अंजुमन उर्दु हायस्कुल व ज्युनियर कॉलेज येथे रविवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमरास दहा क्विंटल तांदुळाच्या गोण्या रिक्षामध्येभरून बाहेर जात असल्याचा प्रकार काही नागरिकांच्या लक्षात आला. त्यांनी तत्काळ त्यांना फोनवरून संपर्क केला. यासंदर्भात मुल्लाजी यांनी मुख्याध्यापकांना संपर्क केला असता समिती आली असल्याने अतिरिक्त तांदुळे बाहेर नेण्यात येत असून येणारा पैसा हा शाळेच्या कामांसाठीच लावला जाईल, असे स्पष्टीकरण मुख्याध्यापकांनी दिल्याची माहिती मुल्लाजी यांनी दिली. या सर्व प्रकाराची वरिष्ठ पातळीवरून चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली असून यासंदर्भात विविध पातळ्यांवर निवेदन दिले आहे. दरम्यान, शालेय पोषण आहार समिती जिल्ह्यात असताना त्यांच्या नाकावर टिचून जामनेरात बिनधास्त पोषण आहाराचा तांदुळ काळ्या बाजारात जात असून हा संपूर्ण यंत्रणेतचा मोठा नाकर्तेपणा असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र शिंदे यांनी केला आहे. यासंदर्भात काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.